Tuesday, May 3, 2016

Suvichar

तुझं माझं करण्यापेक्षा कधीतरी आपलं म्हणून जगा यार.!
तुम्हाला जर मित्र हवे असतीलतर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना..
आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा.
आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे, आणि मित्र म्हणजे लाटा आहेत... समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून... त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत
आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते.
 आयुष्यात Love नावाचा, टाइमपास असायला हवा.पण ???टाइमपाससाठी नाही तर, आयुष्यभर सोबत रहायला हवा..

 आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

 आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते; फक्त कोणाची तरी साथ असावी लागते...

 आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका... जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते...

 आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे, पहिल वहिल प्रेम असत, हिवाळ्यातल्या गवतावर चमकणार, मोत्यासारख दव असत...

 श्रीमंती पैसे कमावण्यात नाही तर पैसे कमावतांना आपल्यातला माणूस घडवण्यात आहे...

 आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका...

 आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

 वयानं मोठ्या झालेल्या माणसाचं सर्वात मोठं दु:ख हेच आहे की त्याला लहानासारखं मोकळेपणानं मनसोक्त रडता येत नाही !

 आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि "आपण" कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि "आपले" कोण आहेत..

 एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे , समोरच्याच्या डोळ्यातल पाणी अलगद पुसता आल पाहीजे , मान अपमान प्रेमात काहीच नसत , आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आल पाहिजे .

 आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

 जितकी माणसं तितकी दु:खं! काही दु:ख उघड उघड दाखविता येतात. काही काळजात खोल खोल लपवावी लागतात.

 आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.

 आरामात जीवन जगायचे असेल तर ऎकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.

 कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा त्याचा शेवट करतो...

 जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही..