Saturday, December 3, 2016

गंमत

मुलगा :- आय लव यु 😘
मुलगी :- नाही😏
मुलगा :- विचार कर 😒
मुलगी :- नाहीच 😶
मुलगा :- वेटर दोघांची वेगवेगळी बिल आण😳😏
.
.
.
मुलगी :- गम्मत केली रे.😳

कावळा*भाड्याने मिळेल.

बेस्ट पुणेरी पाटी..

आमच्या येथे १२/१३व्या चा स्वयंपाक
करून मिळेल..

१५ दिवस आधी ऑर्डर नोंदविणे
आवश्यक...काल एक नविन *पुणेरी पाटी* वाचली...
वाचून बेशुध्द पडता पडता वाचलो...
😰

*पितृ पक्ष* चालू आहे
.
.
.
*कावळा*भाड्याने मिळेल...

😜😜😜😜 😝😝😝😝

जात

मी शाळेत गेलो त्यांनी माझी जात नोंदवून घेतली
मग आम्ही "सारे भारतीय माझे बांधव" ही प्रतिज्ञा रोज रोज म्हटली

त्याला पुस्तके ड्रेस मिळाली,
मी मला मागितली तर ते म्हणाले
"तो गरीब आहे."
"मी पण गरीबच आहे."
"तु गरीब आहेस मान्य पण तुझी जात वेगळी आहे."
दोन गरीबाची पण जात वेगळी असते हे मला त्या दिवशी कळालं.

त्याला स्कॉलरशिप सर्व सुविधा मिळत होत्या
माझी आई रोजंदारी करुन माझं शिक्षण करत होती

आम्ही सोबतच स्पर्धा परीक्षा दिली
(स्पर्धा हा शब्द थोडा चुकीचा नाही वाटत?)
तो सलेक्ट झालता मी नव्हतो झालो
मार्कलिस्ट बघितली त्याला 115 होते आणि मला 145
नंतर कळालं त्यानं फॉर्म सोबत जात प्रमाणपत्र जोडलं होतं.
स्पर्धेतही जातीची परीक्षा असते हे मला त्या दिवशी कळालं

तो सेटल झाला चांगला पैसा ही आला.
घर गाडी सर्व आलं
त्याचं मजेत चालु झालं

अधुनमधुन कुठे कुठे व्याख्यानही द्यायचा
सामाजिक विषयावर तो भरभरुन बोलायचा

एके दिवशी त्याची एका सुंदर मुलीशी भेट झाली
आणि बघताच त्याला ती खुप आवडली

तिच्या मनात काय हे याला नव्हतं माहीत
तीच्यावर मात्र याची बसली होती प्रित

काहीही करुन हवी होती ती त्याला
तिला मिळवण्याचा खटाटोप सुरु केला.

त्या दिवशी मात्र तो गारच पडला
तिची जात दुसरी हे माहीत झालं त्याला

खुप संतापला अन पारा त्याचा चढ़ला
जातीच्या ठेकेदारावर जोराने ओरडला

हा जातिभेद सर्व मुर्खानी तयार केला
माणूस सर्व एकच असतो कोण सांगेन यांना

मग त्याच्या व्याख्यानाचा एकच विषय असायचा
जात गाडून टाका भरसभेत सांगायचा

आतापर्यन्त साथ देणारी जात बाधक झाली होती
त्याची मात्र यामुळे पुरती गोची झाली होती

काय करावे सुचेना त्याला जात आडवी येतेय
सर्व आहे पण एका गोष्टीमुळे बैचैन होतेय

एके दिवशी तो असाच फ़ाइल चाळत होता
रागारागाने तो जात प्रमाणपत्राकडे पाहत होता

त्याच्याकडे बघुन ते प्रमाणपत्र ही हसले
"चुकतोयस बेटा तु, जरा विचार कर" म्हणाले,

"ज्या जातीने जगवलं तिचा तुला आता राग येतोय
फायदा बघुन तु तुझा आज स्वार्थी होतोय"

"तो बघ तुझ्यासोबतचा मुलगा खाजगी कंपनीत जातोय
माझ्यामुळे बेटा तु सुखाची रोटी खातोय

"जातिभेद वाईट हे कुणीही मान्य करेल
पण तुला तेव्हाच हे खटंकतं जेव्हा तुझ्या हिताआड येतयं "

"याआधी तुही तुझी जात अभिमानाने मिरवायचाच
जातीचे सर्व फायदे तोर्यात उचलायचा"

हे ऐकून तो थोडा स्तब्धच झाला
मनाशी काही विचार करता झाला

त्या दिवशी तो माझ्या लग्नात पाहुणा म्हणून आला
"जिंकलास गडया तूच" मजपाशी येऊन म्हणाला

रोख त्याच्या बोलण्याचा मलाही कळला होता
त्याला आवडणाऱ्या मुलीच्या गळ्यात मी हार घातलेला होता

तीच सुंदरी माझी जीवनसाथी झाली होती
कारण तिची न माझी जात एक होती

"कसं आहे ना भाऊ जीवनात प्रत्येकाला सर्वच मिळत नसतं
कुठे न कुठे आपल्याला नमतं घ्यावच लागतं

तुला तुझी जात प्यारी तशीच माझी मला ही
कशाला तत्वज्ञान सांगायचं भाऊ फायद्यासाठी काहीही

खरंच दूर करायचेत का जातिभेद चल मग दोघे मिळून करु
जातीवर नको, जो आर्थिक गरीब त्याला स्कॉलरशिप,सवलती देऊ

जात प्रमाणपत्रे कशाला वाटायची आपण भारतीय होऊ
तू अन मी एकच ही शिकवण सर्वा देऊ

ज्याच्यात असेल गुणवत्ता त्याचं सलेक्शन होईल
त्या दिवशी माझा देश खरा महान होईल

तु ही माणूस मी ही माणूस मग कसला आपल्यात भेद
जातीत विखुरला माणूस त्याचाही वाटतो खेद

जात हा मुद्दा भाऊ निवडणुकीतही गाजतो
दरवेळी आमचा उमेदवार इलेक्शन त्यावर जिंकतो

तुझेन् माझे लालच रक्त माणूस आपली जात
स्वार्थ नको थोड़ी आणू उदात्तता हृदयात

माहीत मजला रुचणार नाही हे कधी ही सर्वात
कारण प्रत्येका हवीय येथे आपल्या सोईची जात

Monday, September 26, 2016

Kimat

कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची
किंमत आहे .
विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते
शक्तीचे उगमस्थान आहे .
खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते तारुण्याचे गुपित आहे .
वाचनासाठी वेळ द्या :- कारण तो ज्ञानाचा पाया आहे.
स्वत:साठी वेळ द्या:- कारण आपण आहोत तर जग आहे.
....आणि अतिशय महत्वाचे "दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..
💐🌹  शुभ सकाळ 🌹💐
🌸सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌸

Wednesday, August 31, 2016

मुलंबाळं

कालचा भन्नाट किस्सा...

माझा जूना दोस्त एकदा माझ्या  ऑफिसवर आला..

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग गाडी संसाराकडे वळाली..

दोस्ताने मला विचारलं ,"मुलं बाळं काय ?"

मी  म्हणाला "हो दोन आहेत..

पहिलीला एक.....
अन
दुसरीला एक..!!"
.
.
.😳😳
.
.
.
. दोस्त जागेवर बेशुद्ध 😡
.
.
.
.
.
.
.

खरंच अवघड आहे मराठी भाषा समजणं... कशीही वळते..!!
😜😜😜😬😜😜😜
.
.
.
.
.
मी शाळेत म्हणतः होतो 😝

Monday, August 22, 2016

तीन गोष्टी

🍇 तीन व्यक्तिंचा मान राखा - आई, वडील, गुरू.
🍇 तिघांपासून सावध राहा - चोरी, निंदा, असत्य.
🍇 तिघांना ताब्यात ठेवा - जीभ, मिजास, क्रोध.
🍇 तिघांची चेष्टा करू नका - अपंग, वेडा, वृद्ध.
🍇 तिघांना जवळ ठेवा -  नम्रता, आदर, धैर्य.
🍇 तीन गोष्टी स्वाधीन ठेवा - राग, जीभ, इच्छा.
🍇 तीन गोष्टींसाठी भांडा - अब्रू, देश, मित्र.
🍇 तीन गोष्टींचा तिरस्कार करा - निर्दयता, गर्व, कृतघ्नता.
🍇 तीन गोष्टी विसरू नका - कर्ज, कर्तव्य, मर्जी.
🍇तीन गोष्टींपासून स्वत:ला वाचवा - वाईट सवय, स्वार्थ, निंदा.
🍇तीन गोष्टींना सांभाळा - धर्म, धन, अश्रू.
🍇 तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करा - मेहनत, विद्या, ईश्वर.
🍇 तीन गोष्टी मिळतात; पण परत येत नाहीत - आई, वडील, तारुण्य.

सुविचार

*जन्म* : दूसर्याने दिला ...
*नाव* : दूसर्या ने ठेवलं ...
*शिक्षण* : दूसर्याने दिलं ...
*रोजगार* : दूसर्याने दिला ...
*इज़्ज़त* : दूसर्यांनी दिली ...
*पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* :
दुसरेच घालणार ...
*मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ...
*आणि स्मशानभूमीत* : दूसरेच घेऊन जाणार...

तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!!
*दु:ख* इतकं नशीबवान आहे की
ज्याला प्राप्त करून लोक...
आपल्या माणसांना *आठवतात*.

*धन* इतकं दुर्दैवी आहे की
ज्याला मिळवून लोक नेहमी...
आपल्या माणसांना *विसरतात*.

किती अजब आहे ना...??

माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे,
पण जखम झाली की रक्त येतं....

आणि
माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून
हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं.

🙏🏻

Friday, August 19, 2016

मा. श्री. डी.एस. कुलकर्णी यांच्या भाषणाचा संपादित अंश...

मुंबई येथे पार पडलेल्या तीन दिवस मराठी उदयोजक परिषद मध्ये मराठी अब्जाधीश उद्योगपती  मा. श्री. डी.एस. कुलकर्णी यांच्या भाषणाचा संपादित अंश...
बिझनेस करताना पुरून पुरून वापरण्याची प्रवृत्ती सोडा. "अंथरून पाहून पाय पसरा" ही ज्या कोणी मराठी माणसाने म्हण तयार केली त्याला आपण माफ करूया, कशाला त्याच्या नादी लागायचे. अरे व्हा ना मोठे, तुम्हाला कोणी सांगितले तुम्हाला अंथरून पांघरून मिळणार नाही म्हणून.
बाबारे मरताना डोक्यावर ५ रु सुद्धा कर्ज नको, ही दुसरी दळीद्री म्हण कोणी निर्माण केली माहित नाही. कर्ज नाही काढलं तर धंधा चालणार कुठनं. आज मुठभर जोंधळे पेरले तर पोतेभर धान्य येत. पोतेभर जोंधळे पेरले तर किती धान्य येईल हा साधा नियम आहे. आता मला सांगा स्वतःच्या घरातील जोंधळे आणून आणून तुम्ही किती आणणार, तो एक नियम आहे.
आज मी व्याख्यान द्यायला आलो आहे. आज मी इथे दमून आलो नाही, तर चिडून आलो आहे, मी आज खूप चिडलो आहे. मी स्वतः रोज माझ्या बायकोला सांगतो की जर माझे आडनाव कुलकर्णी नसतं आणि मी साला मराठी नसतो तर मी आज अंबानीला मागे टाकलं असतं. आपल्यातील जे मराठीपण आहे ना, मीच किती वेळा बोलतो पण मला सुद्धा अजून पूर्णपणे ओवरटेक करता येत नाही. मी पूर्णपणे मराठी नाही, अर्धा मारवाडी, अर्धा गुजराती व मग उरलासुरला मराठी ब्राम्हण आहे.
मी मारवाडी लोकांचा खूप मोठा भक्त आहे. हिशोबाला ते अगदी पक्के असतात. तोंडात नेहमी खडीसाखर असते. डोक्यावर त्यांच्या नेहमी बर्फ असतो. हे लोक नेहमी फ़्लेक्झीबल असतात, ताईसाहेब, काकासाहेब असे मधुर बोलतात. या उलट मराठी माणूस ताठ असतो व म्हणतो काय चुकले माझे बोला.
स्वतःच्या लढाया स्वतःच लढायच्या असतात, दुसऱ्यांच्या लढायांचे वर्णन ऐकताना त्याचे काय चुकले तो का पराभूत झाला, तो विजयी कसा झाला हे शोधण्यापेक्षा तो पराभूत झाला तर का पराभूत झाला, त्याच्या चुका कोणत्या हे शोधा आणि त्यातनं त्या इतिहासातून आपण आपल्या लढाया लढायच्या असतात.
आज आपण भारतासारख्या देशात आहोत, एका बाजूने अतिशय भ्रष्ट आचरणाने देश रसातळाला चालला आहे असे असताना त्याच वेळेला आपल्याकडे दुसरी ताकद म्हणजे जगातील सर्वात तरुण लोकसंख्या ही जगात कोठेही नाही ती भारतात आहे. जगातले सर्वात जास्त तरुण आज भारतात आहेत. जगात सर्वाधिक इंग्रजी बोलणारे आपल्या देशात आहेत ह्या काही आपल्या भक्कम बाजू आहेत, त्यामुळे बिझनेस करणाऱ्याला काही मरण नाही.
बिझनेस मध्ये तुम्हाला तुमचा कस्टमर ओळखता आला पाहिजे, तुम्हाला तुमचे आयुष्य ओळखता यायला पाहिजे आणि त्याला अनुसरून बिझनेस करता यायला पाहिजे. नेहमी आपल्या कस्टमरचा अभ्यास करा. मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा कोणताही बिझनेस असू द्या जर तुमचे ऑफिस असेल तर ते नेहमी स्वच्छ क्लीन नीट नेटके ठेवा यावर सुद्धा तुमच्या बिझनेसचे यश अवलंबून असत.
धंद्यामध्ये मार्केटिंग खूप महत्वाचे. धंद्यामधे विकणारा सर्वात महत्वाचा भाग असतो. जर तुम्हाला व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर तर काहीना काही तरी विकायची पहिल्यापासून सवय ठेवा. विनोदाचा भाग सोडून द्या, पण तुम्हाला टकलू माणसाला सुद्धा कंगवा विकता आला पाहिजे. काहीना काही विकण्याचा आत्मविश्वास निर्माण करा मग तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता.
व्यवसायात प्रेझेंटेशन सुद्धा खूप महत्वाचे. सुरवातीच्या काळात मला किर्लोसकरांनी १०० रु दिले होते, चांगले कपडे, बूट व टाय घेण्यासाठी. तेव्हापासून मित्रांनो ही टाय जी माझ्या गळाल्या लागली आहे ती अजूनही आहे. मी नेहमी कुठेही जाताना व्यवस्तिथ नीटनेटके कपडे घालून जातो. तुमचा पेहरावा असा असला पाहिजे की तुम्ही समोरच्याला आपलेसे वाटले पाहिजे. तुमचे व्यक्तिमत्व इतके स्वच्छ पाहिजे की तुमच्या वागण्या बोलण्यातून लोकांना तुमच्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे.
मित्रांनो विहिरीत, ओढ्यात, स्विमिंग पूल / डबक्यात किती दिवस पोहायचे? नदीकडे आपण जायला हवे व पुढे समुद्राचे ध्येय ठेवले पाहिजे. रोज तुम्हाला बिझनेसला पैसे कमी पडत असतील तर समजा तुम्ही प्रगती करत आहात, आणि जर तुमचे पैसे उरत असतील लक्षात ठेवा तुम्ही धोक्याच्या दिशेने जात आहात. दरवर्षी तुमचा १० टक्केने बिझनेस वाढलाच पाहिजे, तुमची ग्रोथ झालीच पाहिजे....

Sunday, August 14, 2016

भारतीय सेना 10 सर्वश्रेष्ठ अनमोल वचन

✌🎖🇮🇳

भारतीय सेना 10 सर्वश्रेष्ठ अनमोल वचन: अवश्य पढें।
इन्हें पढकर सच्चे गर्व की अनुभूति होती है...

1.
" *मैं तिरंगा फहराकर वापस आऊंगा या फिर तिरंगे में लिपटकर आऊंगा, लेकिन मैं वापस अवश्य आऊंगा।*"
- कैप्टन विक्रम बत्रा,
  परम वीर चक्र

2.
" *जो आपके लिए जीवनभर का असाधारण रोमांच है, वो हमारी रोजमर्रा की जिंदगी है।* "
- लेह-लद्दाख राजमार्ग पर साइनबोर्ड (भारतीय सेना)

3.
" *यदि अपना शौर्य सिद्ध करने से पूर्व मेरी मृत्यु आ जाए तो ये मेरी कसम है कि मैं मृत्यु को ही मार डालूँगा।*"
- कैप्टन मनोज कुमार पाण्डे,
परम वीर चक्र, 1/11 गोरखा राइफल्स

4.
" *हमारा झण्डा इसलिए नहीं फहराता कि हवा चल रही होती है, ये हर उस जवान की आखिरी साँस से फहराता है जो इसकी रक्षा में अपने प्राणों का उत्सर्ग कर देता है।*"
- भारतीय सेना

5.
" *हमें पाने के लिए आपको अवश्य ही अच्छा होना होगा, हमें पकडने के लिए आपको तीव्र होना होगा, किन्तु हमें जीतने के लिए आपको अवश्य ही बच्चा होना होगा।*"
- भारतीय सेना

6.
" *ईश्वर हमारे दुश्मनों पर दया करे, क्योंकि हम तो करेंगे नहीं।"*
- भारतीय सेना

7.
" *हमारा जीना हमारा संयोग है, हमारा प्यार हमारी पसंद है, हमारा मारना हमारा व्यवसाय है।*
- अॉफीसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई

8.
" *यदि कोई व्यक्ति कहे कि उसे मृत्यु का भय नहीं है तो वह या तो झूठ बोल रहा होगा या फिर वो गोरखा ही होगा।*"
- फील्ड मार्शल सैम मानेकशॉ

9.
" *आतंकवादियों को माफ करना ईश्वर का काम है, लेकिन उनकी ईश्वर से मुलाकात करवाना हमारा काम है।*"
- भारतीय सेना

10.
" *इसका हमें अफसोस है कि अपने देश को देने के लिए हमारे पास केवल एक ही जीवन है।*"
- अॉफीसर प्रेम रामचंदानी

💐💐 🙏🏽🙏🙏🏻 💐💐
🙏🇮🇳

।।जयहिंद..... वंदेमातरम्।।

Tuesday, August 9, 2016

Jivan

👇: घरी असतांना सर्व कार्य आटोपल्यावर शांततेत निवांत वाचा. खरोखर छान वाटेल...

👍 कुणाच्या सांगण्यावरुन

आपल्या मनात एखाद्या

व्यक्तीबाबत चांगले वा वाईट

मत बनवण्यापेक्षा, आपण

स्वतः चार पावले चालुन

समोरासमोर त्या व्यक्तीशी

संवाद साधुन मगच खात्री

करा.

नाती जपण्यासाठी
    
संवाद आवश्यक आहे ...

बोलताना शब्दांची उंची

वाढवा आवाजाची उंची

नाही.

कारण..    पडणाऱ्या

पावसामुळे शेती पिकते,

विजांच्या कडकडाटामुळे

नाही..आणि वाहतो तो झरा

असतो आणि थांबतं ते डबकं

असतं..डबक्यावर डास

येतात आणि झऱ्यावर

राजहंस!!  
निवड आपली आहे.."
  
कुणा वाचून कुणाचे काहीच

आडत नाही हे जरी खरे

असले तरी कोण कधी

उपयोगी पडेल हे सांगता येत

नाही.

डोक शांत असेल तर निर्णय

चुकत नाहीत,

अन्...

भाषा गोड असेल तर माणसं

तुटत नाहीत.

अगर ...

एक हारा हुआ इंसान

हारने के बाद भी मुस्करा दे !

तो जितने वाला भी

जीत की खुशी खो देता हैं।

ये है मुस्कान की ताकत ...

जपून टाक पाउल ...

इथे प्रत्येक वाट आपली नसते

जपून ठेव विश्वास ...

इथे प्रत्येक माणुस आपला

नसतो जपून घे निर्णय .

इथे प्रत्येक पर्याय

आपला नसतो

जे भांडल्यावर आधी क्षमा

मागतात, त्यांची चुक असते

म्हणून नव्हे,तर त्यांना

आपल्या माणसांची पर्वा

असते म्हणून...

जे तुम्हाला मदत करायला

पुढे सरसावतात ते तुमचे

काही देणे लागतात म्हणून

नव्हे, तर ते तुम्हाला आपलं

मानतात म्हणुन..!
   
मोर नाचताना सुद्धा रडतो...

आणि...

राजहंस मरताना सुद्धा

गातो...

दुःखाच्या रात्री झोप

कुणालाच लागत नाही...

आणि

सुखाच्या आनंदात कुणीही

झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

किती दिवसाचे आयुष्य

असते?

आजचे अस्तित्व उद्या नसते,

मग जगावे ते हसून-खेळून

कारण या जगात उद्या काय

होईल

ते कोणालाच माहित नसते...

म्हणुन आनंदी रहा.
.= 》

Thursday, August 4, 2016

Excide बॅटरी

एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टीव्हा घेउन गेरेज मधे जाते .
गाडी चेक केल्यावर
मॅकेनिक : मॅडम , बॅटरी बदलावी लागेल
मुलगी : ठीक आहे
मेकॅनिक : exide ची बसवू का ?

मुलगी : (बराच विचार केल्यावर ) नको .. दोन्ही साइड ची बसवा. ...😂😂😂

Wednesday, August 3, 2016

पुणेरी तरूणी

ज्या दिवशी रिक्षामध्ये बसून लिपस्टिक सहजपणे लावता येईल त्या दिवशी शहरातील सर्व खड्डे 😠 बुजले म्हणून समजावे....

---- पुणेरी तरूणी

😁😷😤😝😝😆😆😉😂

Sunday, July 31, 2016

कसं जगावं..?

*कसं जगावं..?  🙄🙄🙄*  😬😜

*मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती. त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही..🤕🤕*
*श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबर करत असणार.. त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं..? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब-राब राबतोय. झालो का श्रीमंत..?👳🏼👳🏼*

*पैशाच्या मागे धावू लागला की म्हणतात, पैशाची हाव सुटली आहे.. 💵💴🏃🏽*
*पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात, त्याच्या जीवनात काही महत्वाकांक्षाच नाही..! 😮😮*

*नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले, तर कवडी चुंबक म्हणतात.*
*चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच, उधळ्या म्हणतात.🤗🤗*

*वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही. लगेच त्याला म्हणणार, बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा..! स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात..?😴😴*

*आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात, काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा..? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं..?🚶🏼🚶🏽*

*जास्त भाविक असला तर म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव..🙂🙂*
*आणि मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.👺👺*

*तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात, अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता. 🗣🗣*
*दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील, अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक..?💂🏼💂🏼*

*मनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ🕷 म्हणतात. जाड असला की हत्ती 🐘 म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.🙁🙁 जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ असल्या माणसांमुळेच पडतो..!👹👹*

*सहज कोणाला मदत केली तर म्हणतात, यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार.*
*नाही मदत केली तर म्हणणार, साधी माणूसकी नाही बघा..😱😱*

*सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात, अंगात थोडातरी स्वार्थ हवा.👨🏻👨🏻*
*स्वार्थी असलाच तर म्हणतात, माणसाचा स्वभाव सरळ हवा. स्वार्थाची संपत्ती काय कामाची..?🤓🤓*

*खेळकर स्वभाव असला तर म्हणतात, आचरट आहे. परिस्थितीचं गांभीर्य नाही. 😏😏*
*आणि गंभीर असणंही त्यांना रुचत नाही. म्हणतात, हसण्याची अलर्जी आहे याला. कोण जवळ येईल याच्या..!😂😂*

*तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते. म्हणतात, आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.💁🏼💁🏼*
*अयशस्वी झालात तर म्हणणार, आमचं ऐकलं नाही. मग भोगा कर्माची फळं..!🙇🏻🙇🏼*

*लोकांचं काय घेऊन बसलात..? काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची त्यांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं..?*  *जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं..?🤔🤔*

*मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय..*
*फिदीफिदी हसतील ते हसू देत की.. बोटं मोडीत बसतील ते बसू देत की..!*
*आपण का शरमून जायचं..?*
*कशासाठी वरमून जायचं?*
*कशासाठी भयाने ग्रासून जायचं..?*
*फुलायच्या प्रत्येक क्षणी कशाला* *नासून जायचं..?*
*आपलं जीवन आपण ठरवायचं, कसं जगायचं..*
*कण्हत-कण्हत कि गाणं म्हणत, हे आपणच ठरवायचं..!*

विरोधाभास


"एक गंमत म्हणून आपल्या देशातील  विरोधाभास सांगतो -

१) 👉 आपण मुलीच्या लग्नासाठी जितका खर्च करतो  तितका तिच्या शिक्षणासाठी कधीच करत नाही.😔

२) 👉आपल्या  देशात पोलिसाला पाहिल्यावर आमच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होण्याऐवजी चिंता निर्माण होते.😱

3) 👉 आपण भारतीय खूप लाजाळू आहोत. तरीही भारताची लोकसंख्या १२१ कोटी आहे.😛

4) 👉आपण भारतीय आपल्या मोबाईलवर स्क्रॅचेस पडू नयेत म्हणून त्यावर स्क्रीन गार्ड लावतो.
परंतु गाडी चालवताना हेल्मेट घालण्याची काळजी घेत नाहीत.😏

5)👉 आपण भारतीय समाज मुलींना बलात्कार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे शिकवतो.
पण मुलांना बलात्कार करू नये असे कधीच  शिकवत नाही.😏

6) 👉  आपल्या देशात अतिशय टुकार सिनेमे सुद्धा अतिशय चांगला व्यवसाय करतात.😝

7) 👉 आपल्या देशात पोर्नस्टार मुलीला एक सिलेब्रिटी म्हणून स्वीकारले जाते.
पण बलात्कारीत मुलीला सामान्य माणूस म्हणूनही स्वीकारले जात नाही.😔

8) 👉  आपले राजकारणी आमच्यात फुट पडतात आणि अतिरेकी आमच्यात एकी निर्माण करतात.😔

9) 👉इथे प्रत्येकजण घाईत असतो. परंतु वेळेत मात्र कुणीच पोचत नाही.😜

१0) 👉इथे अनोळखी व्यक्तीशी बोलणे धोकादायक मानले जाते.
परंतु अनोळखी व्यक्तीशी लग्न करणे चालते.😂

11) 👉 गीता आणि कुराण यांच्या नावावर भांडणाऱ्या लोकांपैकी ९९% लोकांनी ते काय आहे हे माहिती नसते.😱

12) 👉 इथे  चपला वातानुकुलीत दुकानात विकल्या जातात आणि भाजीपाला रस्त्यावर विकला जातो.😀

आयुष्यातलं पाहिलं वस्त्र म्हणजे लंगोट.
त्याला खिसा नसतो.

शेवटचं वस्त्र म्हणजे
गुंढाळलेले कफन त्याला पण खिसा नसतो.

तरीही आयुष्यभर माणसे खिसे भरून घेण्यासाठी तडफडत असतात.

Thursday, July 28, 2016

बघा तुम्हालाच कसं वाटतंय

बघा तुम्हालाच कसं वाटतंय!

रात्रीच्यावेळी सुनसान रस्त्यावर, एखाद्या कुटुंबाची गाडी बंद पडलेली दिसली, तर थांबून मदतीची चौकशी तरी करून बघा. मदत पाहिजेच असेल असं नाही, पण त्यांना थोडा धीर तर निश्चितच  वाटेल.
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
भरपूर ‘व्हर्च्युअल’ मित्र, मैत्रीण असण्याचा जमाना आहे हा, पण कधी एखाद्या खऱ्या मित्राने बरं वाटत नाहीये म्हणल्यावर त्याला ‘whatsapp’वर मेसेज मध्ये ‘Tc’ म्हणण्यापेक्षा सरळ त्याच्या घरी जाऊन ‘बरा हो लवकर’ म्हणून बघा. खरं प्रेम तर मित्राचंच असतं ना?
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
🌺🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐💐
हल्ली लग्न समारंभात प्यायच्या पाण्याची सोय एकाच ठिकाणी असते.
तिथे पाणी प्यायला गेलो तर भांडे भरून, नंतरच्या व्यक्तीला देऊन बघा
तहान तर सगळ्यांनाच लागते ना?
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
नेहमीच्या हॉटेलमध्ये गेल्यावर सकाळच्या चहाची ऑर्डर द्यायच्या आधी वेटरला ‘गुडमॉर्निंग’ म्हणून तर बघा. त्याचा तर दिवस चांगला जाईलच.
पण नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
दिवसभर ‘इडियट बॉक्सला’ सुट्टी देऊन, आपल्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहान मुलांनाही ऐकवा. पराक्रम तर अजूनही तेवढाच थोर ना? तुमचीही उजळणी होईल.
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
‘डोरक्लोजर’वाल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर मागून येणाऱ्या ‘स्त्री’साठी दरवाजा आवर्जुन उघडा ठेवा,
ती ‘स्त्री’आहे म्हणून नाही, पण तुम्ही ‘जंटलमन’ आहात म्हणून!
नंतर सांगा तुम्हाला कसं वाटतंय?
😊😊😊😊😊😊😊😊😊
गाडी चालवताना कुठलीशी वृद्ध व्यक्ती/मुलं रस्ता ओलांडण्यासाठी भांबावून थांबलेली दिसतात, दरवेळी गाडीतून नाही उतरता येत, पण निदान मागच्या गाड्यांना थांबवून आधी त्यांना रस्ता ‘क्रॉस’ करता येईल, एवढं तरी करून बघा. रस्ता तर चालणाऱ्याचाही असतो ना? फारतर १ मिनिट उशीर होईल पोचायला..
पण नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय !!
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
नेहमीची कार सोडून कधीतरी बाईकवर एकटेच निघून बघा मनपसंत हायवेला सुस्साट स्पीडने मोजून करा ओव्हरटेक २०० ट्रक, १०० बसना, त्याच जुन्या उत्साहात. आल्यावर चेहेरा माखलेला असेल धुळीने, धुराने.
शिव्या पण खाल्ल्या असतील ४ गाडीवाल्यांच्या ..
तरी नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
मुद्दाम हायवेवरच्या एखाद्या टिनपाट टपरीवर, अर्ध्या फळकुटाच्या बाकड्यावर बसून सकाळपासून दहा वेळा उकळ्या आलेला चहा पिऊन वयस्कर चहावाल्याला बघा तर उगाचच सांगून ‘मामा चहा १ नंबर झाला आहे बरंका’
तो मनाशीच हसेल खुळ्यागत! पण लाजून म्हणेल, ‘पाव्हनं म्होरच्या टायमाला च्यात दुध वाईच वाढवून देतो, पर नक्की यायाच’! जाताना त्याला शेकहॅण्ड करा न चुकता. व्यावसायिक तर तोपण आहे ना?
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
स्वतःच्या जुन्या कॉलेजमध्ये, त्याच जुन्या मित्रांच्या बरोबर आपल्याच हक्काच्या ‘कट्ट्यावर’पुन्हा एकदा विनामतलब तंगड्या हलवत, गाणी म्हणत बसून बघा. एखादी शिट्टी पण मारा दणकून खूप वर्षांनी ..
नव्याने तरुण व्हायला कोणाला नाही आवडणार? नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
आपल्याकडे कामाला असलेल्या माणसांच्या मुलांकरता कधीतरी स्वतःच्या मुलांसोबत एखादे छोटेसे खेळणे देऊन बघा. पैसे नाही लागत त्याला जास्त ..
पण नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
ऑफिसच्या केबिनमधे ‘रूम फ्रेशनर’ फसफसून मारण्यापेक्षा आपल्याच बाल्कनीतल्या कुंडीत लावलेले एखादे गुलाबाचे, चाफ्याचे फुल ठेवून बघा कधीतरी टेबलवर. खरा सुगंध तर तोच ना ?
नंतर सांगा, तुम्हालाच कसं वाटतंय!
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺