Saturday, March 12, 2016

आई- वडील" म्हणजे नक्की काय असत

🌷 आई-वडील 🌷

🙏 "आई- वडील" म्हणजे नक्की काय असतं?

🙏 आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं, अँडव्हान्स पाठबळ असतं...!!!

🙏 तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं, तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य खर्चलेलं असतं...!!!

🙏 "आई" तुमच्या
आयुष्याचे योग्य
दिशा देणार "स्टीयरिंग" असतं...!!!

🙏 तर अचानक आलेल्या संकटात सावरायला, "वडील"
म्हणजे "अर्जेंट ब्रेक" चा पर्याय असतं...!!!

🙏 "आईचं प्रेम" हे रोजच्या आयुष्यात कामाला येणारं "बँक बॅलन्स" असतं...!!!

🙏 तर "वडील" म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस
किंवा "व्हेरिएबल पेमेंट" असतं...!!!

🙏 "आई" म्हणजे, तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलचं "नेटवर्क" असतं...!!!

🙏 आणि कधी "नेटवर्क" थकले;
तर "वडील" अर्जंट "SMS" असतं...!!!

🙏 "आई" म्हणजे तुमच्या
आयुष्यातलं "अँटीव्हायरस" असतं...!!!

🙏 तर शोधून काढलेले व्हायरस संपवायचं "वडील"
हे "क्वारनटाईन" बटण असतं...!!!

🙏 "आई" म्हणजे तुमच्या
आयुष्यातलं "शिक्षणाचं  विद्यापीठ" असतं...!!!

🙏 तर "वडील" म्हणजे चालती बोलती अनुभवाची फॅक्टरी असते...!!!

🙏 "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई असते...!!!

🙏 तर "वडील" म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते...!!!

🙏 "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातला मागर्दशर्क गुरू असतो...!!!

🙏 तर दाखवलेल्या वाटेवर "वडील" हा जवळचा मित्र असतो...!!!

🙏 "आई" म्हणजे साक्षात भगवंत, परमेश्वर असतो...!!!

🙏 तर त्या परमेश्वरापर्यंत पोचवणारा "वडील" एक संत असतो...!!!

🙏 "आई" म्हणजे तुमचे शरीर, मेंदू, हृदय आणि मन असतं...!!!

🙏 तर "वडील" म्हणजे भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं...!!!

🙏 कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य "आई गंSSS" असतं...!!!

🙏आणि भले मोठे संकट आले की उच्चारात "बाप रे बाप" असतं...!!!

🙏 परमेश्वर समोर आला तरी उभे राहायला वीट फेकलेल पुंडलिकाचं मन असतं...!!!

🙏 त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं...!!!

म्हणूनच म्हणतो...

🙏 परमेश्वर, अध्यात्म, भगवंत हे सगळे अजब गणित असतं...!!!

त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं
🙏"आई- वडील" हे कनेक्शन असतं...!!!

🙏 "आई- वडील" म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असतं...!!!

उगाच नाही आपल्या संस्कृतीत
   🙏"मातृ देवो भव" अन् "पितृ देवो भव" म्हणलेलं असतं...