Saturday, March 19, 2016

संस्कृत आणि अर्थ

😜 झकास जोक्स 😜
मास्तर :
कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन।।
बंड्या याचा अर्थ सांग?

बंड्या:

करमत नसल्यामुळे
राधिका रस्त्यावर
फिरत असते,
कदाचित तिला फळ घ्यायचे असतील  !

मास्तर कोमात

😛😂😂😂😆
गुरूजी :

बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन! याचा अर्थ काय ?

बंड्या : माझे अनेक जन्म झाले आहेत पण तुझा जन्म चार जूनला झाला आहे !

😜😝😎

गुरूजी : मुर्खा...📢📢📢😠😠
.बरं आता सांग...
"दक्षिणे लक्ष्मणोयस्य वामे तु जनकात्मजा" याचा अर्थ काय ?

बंड्या : दक्षिणेकडून लक्ष्मण आला आणि म्हणाला... जनका... तुझी मजा आहे !

मास्तर सैरा वैरा पळत आहेत
😂😝😜😆
गुरूजी- बंड्या, याचा अर्थ सांग😡😡
" हे पार्थ त्वया चापि मम चापि...!"

बंड्या - हे अर्जुना, तू (शांतपणे) चहा पी, मी पण पितो.

😀😀😛😛😂😂

गुरुजींनी चहा कायमचाच सोडला...