Sunday, July 31, 2016

विरोधाभास


"एक गंमत म्हणून आपल्या देशातील  विरोधाभास सांगतो -

१) 👉 आपण मुलीच्या लग्नासाठी जितका खर्च करतो  तितका तिच्या शिक्षणासाठी कधीच करत नाही.😔

२) 👉आपल्या  देशात पोलिसाला पाहिल्यावर आमच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होण्याऐवजी चिंता निर्माण होते.😱

3) 👉 आपण भारतीय खूप लाजाळू आहोत. तरीही भारताची लोकसंख्या १२१ कोटी आहे.😛

4) 👉आपण भारतीय आपल्या मोबाईलवर स्क्रॅचेस पडू नयेत म्हणून त्यावर स्क्रीन गार्ड लावतो.
परंतु गाडी चालवताना हेल्मेट घालण्याची काळजी घेत नाहीत.😏

5)👉 आपण भारतीय समाज मुलींना बलात्कार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे शिकवतो.
पण मुलांना बलात्कार करू नये असे कधीच  शिकवत नाही.😏

6) 👉  आपल्या देशात अतिशय टुकार सिनेमे सुद्धा अतिशय चांगला व्यवसाय करतात.😝

7) 👉 आपल्या देशात पोर्नस्टार मुलीला एक सिलेब्रिटी म्हणून स्वीकारले जाते.
पण बलात्कारीत मुलीला सामान्य माणूस म्हणूनही स्वीकारले जात नाही.😔

8) 👉  आपले राजकारणी आमच्यात फुट पडतात आणि अतिरेकी आमच्यात एकी निर्माण करतात.😔

9) 👉इथे प्रत्येकजण घाईत असतो. परंतु वेळेत मात्र कुणीच पोचत नाही.😜

१0) 👉इथे अनोळखी व्यक्तीशी बोलणे धोकादायक मानले जाते.
परंतु अनोळखी व्यक्तीशी लग्न करणे चालते.😂

11) 👉 गीता आणि कुराण यांच्या नावावर भांडणाऱ्या लोकांपैकी ९९% लोकांनी ते काय आहे हे माहिती नसते.😱

12) 👉 इथे  चपला वातानुकुलीत दुकानात विकल्या जातात आणि भाजीपाला रस्त्यावर विकला जातो.😀

आयुष्यातलं पाहिलं वस्त्र म्हणजे लंगोट.
त्याला खिसा नसतो.

शेवटचं वस्त्र म्हणजे
गुंढाळलेले कफन त्याला पण खिसा नसतो.

तरीही आयुष्यभर माणसे खिसे भरून घेण्यासाठी तडफडत असतात.